जळगाव मिरर | ७ मार्च २०२४
मोकळ्या मैदानात फिरत असलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळू विठ्ठल पवार (वय ८५) यांच्यावर मोकाट गुरांनी हल्ला चढविल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना दि. ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजच्या समारास भडगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या मैदानात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भडगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ अॅड. महेश पवार हे वास्तव्यास आहे. त्यांचे वडील बाळू पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते दि. ५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरासमोर असलेल्या मैदानावर पायी फिरत होते. अचानक मोकाट गुरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. ही घटना त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत वृद्ध पवार यांनी सुटका केली. मात्र गुरांच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची अवघ्याक काही तासातच प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच यापुढे अशी दुर्देवी घटना घडू नये म्हणून पाचोरा नगरपालिका प्रशासनाने मोकाट सोडलेल्या गुरांना ठाणबंद करुन त्यांच्या मालकांवर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.