जळगाव मिरर | 10 मार्च 2024
आजच्या डिजिटल युगात कामगार ही स्मार्ट व्हावा म्हणून कामगार विभाग राबवित असलेल्या योजना महत्वाच्या आहेत. या सर्व कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द आहे. कामगारांना काम करताना सुरक्षितता मिळावी म्हणून 10 हजार रुपये किमतीचे सुरक्षा व अत्यावाश्यक संचचे वाटप करण्यात येते. यामुळे अपघातापासून कामगारांचा बचाव होवून कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी योजनांची मंडळामार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येऊन शेवटच्या कामगारांपर्यंत लाभ पोहचवा. प्रत्येक कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
वावडदा येथे रवी कापडणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच व गृहपयोगी संच (भांडी) वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जिल्ह्यात 80 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली असून आता पर्यंत 16 हजार कामगाराच्या कुटुंबीयांसाठी
लाभ देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, दुध संघाचे रमेश पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पी. के. पाटील व उपशिक्षक विशाल पवार यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ते रवी कापडणे यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवी कापडणे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, प्रतापराव पाटील, दूध संघाचे संचालक रमेश पाटील, उपसरपंच अनिल पाटील, ग्रा.प. सदस्य राजेंद्र मराठे, संतोष कापडणे, आप्पा पवार, मुकुंदा पाटील, राकेश भिल, रवी चव्हाण, पंडित पाटील, महेंद्र चव्हाण, पोपट पाटील, प्रकाश पाटील, सुधाकर येवले, कोमल पवार, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, शेतकी संघाचे ब्रिजलाल पाटील, राजुभैया पाटील, धोंडू जगताप, पी.के.पाटील ज्ञानेश्वर काटोले, संदीप सुरळकर, नितीन जैन व समाधान चिंचोरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.