जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माहेश्वरी यांना निवेदन दि.१० रोजी देण्यात आले.
निवेदन म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष २१-२२ च्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांचा उन्हाळी सत्र परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात याव्या किंवा ऑफलाइन बहुपर्यायी पद्धतीने घेतल्यास सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे जास्तीत जास्त २०० बहुपर्यायी प्रश्नाला प्रश्नसंच उपलब्ध करून द्यावा व त्यावर परीक्षा घेण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष चौधरी, कुणाल पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.




















