जळगाव मिरर | १९ मार्च २०२४
यावल तालुक्यातील अंजाळे गावातील मोर नदी पात्रात शेळगाव बॅरेजचे बॅक वॉटरच्या पाण्यात गुरे चराईसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा तोल जावून बुडाल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजाळे येथील शेतकरी सुनील ने दिलीप बादशाह (वय ३०) हा १८ मार्चला गावातील परिसरात डे असलेल्या मोर नदीपात्रात गुरे . चराईसाठी गेला होता. म्हशीला न नदीपात्रातून बाहेर काढताना त्यांचा पाय घसरला. या वेळी तोल जाऊन खोल पाण्यात हा तरुण बुडाला. ही घटना सायंकाळी घडली. दरम्यान, त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या गुराख्याने ही ग्रामस्थांना दिली.
गावातील पोहोणाऱ्यांच्या मदतीने सुनील बादशाह याला पाण्यातून त्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर यावल ग्रामीण रुग्णाण्यात आणले, तेथे डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी भरत बादशहा यांच्या माहितीवरुन यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करत आहेत. मृत सुनीलच्या पश्चात आई-वडील, पत्नी, ३ वर्षांचा मुलगा, ७ महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. विवाहित तरुणाच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.