जळगाव मिरर | १९ मार्च २०२४
देशभर लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागली आहे तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाही तर शरद पवार गटाचे नेते आ.एकनाथ खडसे यांनी दोन दिवसापूर्वी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यांच्या वक्तव्यावर आता भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी देखील प्रतिउत्तर दिले आहे.
आ.खडसे यांनी म्हटले होते कि, जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र विचारत नव्हतं, त्यावेळी मी राजकारणात भाजपला जिल्ह्यात मजबूत केले, असे वक्तव्य आ.एकनाथ खडसे यांनी केले होते.
भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर म्हणाले कि, ज्या भाजप विषयी तुम्ही बोलतात त्याच भाजपने तुम्हाला बारा खात्याचे मंत्री केले. भाजपने तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद दिले. भाजपने तुमच्या मुलीला जिल्हा बँकेचा अध्यक्षपद दिले. भाजपनेच तुमच्या पत्नीला जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष पद दिले. एवढा असतानाही तुम्ही भाजपला कुत्रही विचारात नव्हता, असे म्हणत असाल तर याच म्हणण्याप्रमाणे आज तुमची परिस्थिती झाली आहे. या शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी एकनाथ खडसेवर निशाणा साधला आहे.
बेताल वक्तव्यासाठी एकनाथ खडसे सध्या प्रसिद्ध आहेत. यापुढे बोलताना वयाचे भान ठेवून वक्तव्य करा, असा टोला सुद्धा भाजप जिल्हाध्यक्ष यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. भाजप सोडल्यानंतर तुमचीच परिस्थिती तुम्ही जसं बोलले कुत्र विचारत नाही, त्याप्रमाणे झाली आहे, असे ज्ञानेश्वर जळकेकर यांनी म्हटले आहे.
