पारोळा : प्रतिनिधी
शहरातील मुख्य चौक तसेच गावातील व काॕलनी परिसरातील मुख्य रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली होती. या रस्त्यांची चौकांची तातडीने दुरूस्ती यासाठी आ. चिमणराव पाटील यांच्यांकडे शहरवासियांकडुन मोठी मागणी होत होती. आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी शहराचा विकासात अधिक भर करण्यासाठी मुख्य चौक सुशोभिकरण व मुख्य रस्ते बांधकामासाठी तब्बल ५ कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.
गेल्या काळात आ. पाटील यांच्या प्रयत्नाने शहरात रस्ते विकासासाठी ४ कोटी, जलतरण तलाव बांधकामासाठी २.५० कोटी, शहरासाठी अत्यंत ज्वलंत असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी ४५ कोटी निधी मिळाला होता. आता परत शहरातील आझाद चौक सुशोभिकरण – ५० लाख, झपाट भवानी चौक सुशोभिकरण – ५० लाख, मोठा महादेव चौक सुशोभिकरण – २५ लाख, शनिमंदीर भागातील तुकाराम महाराज चौक सुशोभिकरण – २५ लाख, गट नं. १३८ या ओपन स्पेस मध्ये गार्डन विकास – ५० लाख, गट नं.७६८ या ओपन स्पेस मध्ये गार्डन, जिम व वाचनालय – ५० लाख, शहरातील पीर दरवाजा ते नगरपरिषद ते पाताळेश्वर मंदीर प्रवेशव्दारापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण – ८२ लाख, कजगांव रस्ता ते आर.सी.पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण – ३७ लाख, बँक आॕफ महाराष्ट्र ते मोठा महादेव चौकापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण – १६ लक्ष, जगमोहनदास नगर भागातील एल.बी.नेतकर यांच्या घरापासुन ते एच.बी.पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता खोदकामासह काँक्रीटीकरण व गटारीचे बांधकाम – १८ लक्ष, जगमोहनदास नगर भागातील बी.टी.पाटील यांच्या घरापासुन ते एन.एस.पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता खोदकामासह काँक्रीटीकरण व गटारीचे बांधकाम – १८ लक्ष, जगमोहनदास नगर भागातील लोटन शिंपी यांच्या घरापासुन ते मिलिंद मिसर यांच्या घरापर्यंत रस्ता खोदकामासह काँक्रीटीकरण व गटारीचे बांधकाम – १४ लक्ष, जगमोहनदास नगर भागातील दाडकर यांच्या घरापासुन ते.एल.पी.मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता खोदकामासह काँक्रीटीकरण व गटारीचे बांधकाम – १६ लक्ष, उंदीरखेडा रस्त्यापासुन ते .सी.के.वाणी यांच्या घरापर्यंत रस्ता खोदकामासह काँक्रीटीकरण व गटारीचे बांधकाम – २७ लक्ष, पंडीत कुंभार यांच्या घरापासुन ते हाॕटेल साहेबा व एस.डी.मोरे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे खोदकामासह काँक्रीटीकरण – २२ लक्ष या कामांसाठी ५ कोटी मंजुर करण्यात आले आहेत.
या कामांमुळे शहराचा विकासात मोठी भर होणार असुन शहरवासियांना दैनंदिन उद्भवणाऱ्या समस्या सुटणार आहे. या मंजुर कामांमुळे शहरवासियांनी आ. चिमणराव पाटील यांचे आभार मानले आहेत. तसेच शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मंजुर केल्याबद्दल आ. चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.