जळगाव मिरर | २० मार्च २०२४
लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर राज्यातील १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असुन जळगाव जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रूजू होणार आहे. तर जळगाव येथे धुळे सीईओ असलेले शुभम गुप्ता रुजू होणार आहे. तसे आदेश सायंकाळी जि.पला प्राप्त झाले आहे.
श्री अंकित गेल्या ९ ते १० महिन्यापुर्वीच जळगाव जि.पत रूजू झाले होते. काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर गेल्या आठवड्यापासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. मात्र आचारसंहितेनंतरच त्यांची बदली होईल अशी चर्चा आता सुरू झाली होती. मात्र आज शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे नितीन गद्रे यांचे आदेश जि.पला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाला आहे. धुळे जि.पचे सीईओ शुभम गुप्ता यांची आता जळगाव सीईओपदी नियक्ती झाली आहे. श्री. अंकित यांनी विभागीय आयुक्तांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून नविन पदाचा कार्यभार स्विकारावा असे आदेशात म्हटले आहे.