जळगाव मिरर | २६ मार्च २०२४
होळी हा बंजारा समाजाचा महत्त्वाचा सण स्मिताताई वाघ भारतीय संस्कृतीमध्ये होळी महत्त्वाचा सण असून बंजारा समाजाने आपली परंपरा ही कायम ठेवली असून आजही समाजातील महिला भगिनी पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरी करत असून महिला भगिनींनी आपली संस्कृती अजूनही जोपासून ठेवली आहे हि अभिमानाची गोष्ट आहे असे जळगाव लोकसभेच्या स्मिताताई वाघ यानी काल रामदेववाडी ता.जळगाव बंजारा समाज व भाजप महिला मोर्चातर्फे पारंपरिक होळीचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपा महायुती जळगाव लोकसभा उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यानी बंजारा समाजाच्या महिला भगिनींना धुलीवंदन टिळा लावून होळी साजरी केली व शुभेच्छा दिल्या व महिलांसोबत नृत्यामध्ये सहभाग घेतला या प्रसंगी जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे, प्रदेश सचिव रेखाताई वर्मा ज्योतीताई निंभोरे भारतीताई सोनवणे वंदनाताई पाटील भाग्यश्री ताई चौधरी निलाताई चौधरी गायत्रीताई राणे सुरेखाताई तायडे गीतांजलीताई ठाकरे लताताई बाविस्कर यासह असंख्य महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येसह उपस्थित होते या नंतर समाज बांधवांनासह पारंपरिक होळी उत्सवाचा आनंद घेतला.