जळगाव मिरर | १ एप्रिल २०२४
देशात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे रणशिंग सूरू झाले असून, जळगाव लोकसभेसाठी दिनांक १३ मे मतदान असून या निवडणुकीच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज दिनांक १ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भाजपा कार्यालय जी.एम. फाऊंडेशन येथे जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजन करण्यात आली होती.
या बैठकीत महायुतीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांना विजयी करण्याच्या संकल्प केला. या बैठकीत आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी भाजपा जिल्हा जिल्हाध्यक्ष सौ. उज्वलाताई बेंडाळे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, गणेश सोनवणे, शामभाऊ कोकटा राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, सुशिल शिंदे RPI A गट महानगर अध्यक्ष, अनिल अडकमोल, अनिल लोंढे, विनोद देशमुख, सौ. सरिताताई माळी कोल्हे, जिल्हा अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, वि.स.नि.प्र विशाल त्रिपाठी, प्रदेश महिला सचिव रेखाताई वर्मा, जिल्हा पदाधिकारी डॉ. अश्विन सोनवणे, अरविंद देशमुख, महेश जोशी, जितेंद्र मराठे, अमित भाटिया, सुनील खडके, व कुंदन काळे, ॲड दीपक पोकळे, मिलिंद सोनवणे, जितेंद्र चांगरे, महेश पाटील, किरण अडकमोल, शेख इद्रिस, शेख फिरोज, शेख इरफान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




















