जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना सत्ताधारी व विरोधाकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असतांना शरद पवार यांच्यासह ठाकरेंच्या पक्षासह कॉंग्रेसमध्ये नेत्यांनी भाजपात प्रवेश घेत असून यावर आता शरद पवारांनी थेट भाजपला इशारा दिला आहे.
शरद पवार म्हणाले कि, पक्ष फोडणाऱ्यांना योग्य जागा दाखवणार, असे म्हणत थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे. तर पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना हजारोंच्या नाहीतर लाखोंच्या संख्येने चिवट शिवसैनिक आणि कार्यकर्ते योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असे शरद पवारांनी म्हटले आहे. दरम्यान मी पुन्हा येईन म्हटले होते. पण, त्यासाठी अडीच वर्षे लागली. अडीच वर्षांनी दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना सोबत घेऊन आलो, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
शरद पवार म्हणाले की, आपल्या सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीच्या जोरावर आपण नक्की यश मिळवू. नक्की जास्ती जागा जिंकू. बारामती लोकसभेची जागा तुम्हा लोकांच्या हातात आहे. तुमच्या कष्टाने बारामतीत नक्की यश संपादन करू. बारामतीकडे सुदैवाने देशाचे लक्ष आहे. याचा अर्थ तुमच्या कर्तुत्वाची, हिंमतीची नोंद देश पातळीवर घेतलेली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन होईल अशी चिन्ह होती. परंतु, अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीची स्थापना झाली. महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले. अडीच वर्षे महाविकास आघाडीने सरकार चालवले. परंतु, जून 2022 मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आणि महाविकास आघाडीला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर लागलीच वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. त्यामुळे दोन्ही पक्षांना फोडून मी पुन्हा आलो असं फडणवीस म्हणाले.