जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२४
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा भाजप नेते गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात तसेच आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे व महायुतीचे लोकसभेचे उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्या सूचनेनुसार जळगाव शहरात भाजपा युवा मोर्चा तर्फे कॉफी विथ युथ या कार्यक्रमाचे ठिकठिकाणी मंडल निहाय आयोजन करण्यात आले होते. शंभर हून अधिक ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात आला.
जळगाव शहरात जुने जळगाव, अयोध्या नगर, शिवाजीनगर, मेहरून परिसर, एमजे कॉलेज परिसर, रिंग रोड परिसर, बळीराम पेठ, सिंधी कॉलनी कंजरवाडा, सम्राट कॉलनी, या सर्व भागात युवा संवाद साधण्यात आला. युवकांनी देशाला आत्मनिर्भर विकसित विश्वगुरू भारत बनविण्यासाठी भाजपा ला मतदान करुन मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी संवादातून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील व कॉफी विथ या कार्यक्रमाचे संयोजक अक्षय जेजुरकर यांनी आव्हान केले. तसेच देशाचे लाडके प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आला.
कॉफी विथ युथ कार्यक्रमात युवा संवाद अंतर्गत युवा वर्गाकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला सर्व युवकांनी नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांची प्रशंसा केली त्याबद्दल आपले मत व्यक्त केले या संपूर्ण कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा युवा मोर्चाचे सरचिटणीस गजानन वंजारी, मयूर कापसे, विकास सोनार, सागर जाधव, उपाध्यक्ष दिनेश पुरोहित, राहुल लोखंडे, योगेश बागडे, कल्पेश सोनवणे, रोहित सोनवणे, सतनाम सिंग बावरी, अश्विन सैंदाणे, सुनील भारंबे, गौरव ढेकळे, स्वप्नील भांडारकर, उन्मेष चौधरी, मयूर भदाणे, शेखर सोनवणे, धीरज पुरोहित, मयूर जोगी, सुशील चौधरी, संकेत शिंदे, पंकज गागडे, सर्व जिल्हा मंडल पदाधिकारी उपस्थित होते