एरंडोल : प्रतिनिधी
भररस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार होणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एरंडोल शहरातून अटक केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोहेकॉ सुनील दामोदरे, पोना नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाने, पो.कॉ. सचिन महाजन यांचे पथक तयार करून रवाना केले.
हातातून मोबाइल लंपास करणाऱ्या संशयित आरोपी हा एरंडोल शहरात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी १२ मे रोजी पथकाने कारवाई करत संशयित आरोपी महेंद्र बापू महाजन (वय-२१) रा. मोठा माळीवाडा एरंडोल याला अटक केली. त्याच्या ताब्यातून ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.