जळगाव मिरर | २० एप्रिल २०२४
दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी समोरील झाडावर जावून आदळली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार मायलेकी गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास खोटेनगर परिसरात घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रूबीना हारूण पटेल या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १६ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता रूबीना पटेल या महिला आपल्या मुलगी तमन्ना असे दोनजण शागीर सुलतान चव्हाण रा. पाटीलवाडा भुसावळ यांच्या दुचाकी (एमएच १९ ईएफ ८२८४) वर बसून पाळधी येथे होत्या. दरम्यान, खोटेनगर येथे दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी थेट रस्त्यावरील झाडावर आदळली. यात रूबीना व तिची मुलगी तमन्ना हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी बुधवारी दुचाकी चालविणाऱ्या शागीर सुलतान चव्हाण यांच्यावर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव हे करीत आहे.