जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२४
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे सुरत हून भुसावळ जाणाऱ्या मालगाडीच्या धक्का बसल्याने आव्हाणी येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या बाबत रेल्वे ड्रायव्हर ने येथील स्टेशन वर माहिती दिली. पंकज रमेश पाटील (वय २६) असे तरूणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, टहाकळी शिवारातील रेल्वे खांब क्र. २९७/२४ ते २९७/२२ चे मध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास मालगाडी सुरत हून भुसावळ येथे जात असताना अचानक एक तरुणाला धक्का बसल्याची माहीती रेल्वे ड्रायव्हरने येथिल स्टेशन वर दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा तो तरुण आव्हाणी येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा भाऊ विकी रमेश पाटील याने त्याला ओळखून तो पंकज रमेश पाटील (२६) आव्हाणी येथिल राहणार असल्याचे सांगितले. या बाबत गँगमन महेंद्र पाटील याने दिलेल्या फिर्यादी नुसार अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला.