जळगाव मिरर | १ मे २०२४
भरधाव कार व दुचाकीमध्ये धडक झाल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सावदा शहरातील वयोवृद्धासह तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सावदा-पाल महामार्गावरील कोचूरजवळ घडला. विरेंद्र सुनील नेमाडे (27) व अनिल चुडामण मेढे (65, दोन्ही रा.चिनावल) यांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालक एअरबॅग उघडल्याने बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिनावल येथील विरेंद्र सुनील नेमाडे (27) हे अनिल चुडामण मेढे (65) हे हिरो होंडा कंपनीच्या दुचाकी (एम.एच.19 ए.बी.1101) वरून हे सावद्याकडून चिनावलकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला व होंडा बी.आर.व्ही.कार (एम.एच.19 डी.एम.0351) ने जोरदार धडक दिली. या धडकेते दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाले तर कार चालक एअर बॅग उघडल्याने बचावला मात्र त्यास किरकोळ जखम झाला. अपघातानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी टाहो फोडला.महेंद्र हेमंत नेमाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.