जळगाव मिरर | २ मे २०२४
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान मोदी राज्यात सभांचा तडाखा सुरु असतांना अनेक मोठे गोप्यस्फोट होत आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील एक मोठा गोप्यस्फोट केला आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली होती असा दावा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तसेच महाराष्ट्रात आमच्यासाठी लोकसभा अग्निपथही नाही. पंतप्रधान मोदींनी एक वातावरण तयार केले आहे. त्यामुळे आम्ही विजय मिळवू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही मुख्यमंत्री बना, असे म्हणत मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र वेळ निघून गेली होती. आम्ही एकनाथ शिंदेसोबत एकत्र येत आहोत हे चित्र जेव्हा स्पष्ट झाले. त्यादिवशी सकाळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना सोबत घेता किंवा त्यांना एखादे पद देता? मी संपूर्ण पक्षच घेऊन येतो. तुम्ही मुख्यमंत्री बना आपण हे सगळे नीट करू”, फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची चित्र आहे.
यावेळी यंदाची निवडणूक भाजपसाठी सोपी नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत फडणवीस म्हणाले, ”कोणतीही निवडणूक सोपी नसते. पण महाराष्ट्रात आमच्यासाठी लोकसभा अग्निपथही नाही. पंतप्रधान मोदींनी एक वातावरण तयार केले आहे. त्यामुळे आम्ही विजय मिळवू. निवडणुकीत आव्हान तर असते. आपण जिंकणारच आहोत, असे समजून चाललो की, आपले जिंकण्यासाठीचे प्रयत्न कमी होतात”, असे फडणवीस म्हणाले.
पुढे बोलतांना ते म्हणाले, ”मी प्रत्येक निवडणूक आव्हान समजूनच लढत आलो आहे. महाराष्ट्रात विजय मिळविण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी होत आहे. प्रचारासाठी फिरत असताना लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे, तो पाहता आम्हाला विजयाची खात्री आहे”, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.