जळगाव मिरर | २ मे २०२४
मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशात लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु असून नागरिकांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. सिलेंडरच्या दरात नुकतीच कपात करण्यात आली असून मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन उत्पादन कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयासह एक नवी सुरुवात केली आहे.
शासन आणि तेल उत्पादन कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरचे दर 19 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, सदर निर्णयानंतर या सिलेंडरची किंमत 1745.50 रुपयांवर पोहोचली आहे. संपूर्ण देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत.
एप्रिल महिन्यात इंधन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात साधारण 30.50 रुपयांची घट केली होती. त्याआधी मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात मात्र हे दर 25.5 रुपये आणि 14 रुपयांनी अनुक्रमे वाढले होते. सध्याच्या घडीला सिलेंडरच्या दरांमध्ये करण्यात आलेल्या कपातीनंतर आता दिल्लीमध्ये सिलेंडरचे दर 1745.50 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, कोलकाता येथे व्यावसायिक सिलेंडरचे दर 1859 रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबई आणि चेन्नईमध्ये हे दर अनुक्रमे 1698.50, 1911 रुपयांवर पोहोचले आहेत.