जळगाव मिरर | ८ मे २०२४
शरद पवारांनी नुकतेच प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या भाकितावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना त्यांचा पक्ष चालवणं शक्य होणार नसल्यानं त्यांनी विलिनीकरणाचे संकेत दिले, असं फडणवीस म्हणाले. धुळ्यातील शिरपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांना असं म्हणायचं असेल त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा, असे त्यांच्या डोक्यात असेल. शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी संकेत दिले कारण त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील.