जळगाव मिरर | ९ मे २०२४
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था व समस्त शिंपी समाजाच्या वतीने पद्मावती मंगल कार्यालय येथे जळगाव व रावेर लोकसभे मतदारसंघातील समस्त शिंपी समाज बांधवांचा जागरूक मतदान अभियाना संदर्भात एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यातील विविध संस्थांचे ५०० च्या वर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये सर्वप्रथम मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो या माध्यमातून आनंद शिंपी यांनी उपस्थित समाज बंधू-भगिनींना मी मतदान करणार व करून घेणार याची शपथ दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेक जगताप अनिल खैरनार मनोज भांडारकर मुकुंदराव मेटकर सुधाकर कापुरे संभाजीराव शिंपी योगेश खैरनार नथू शिंपी अशोक सोनवणे निलेश चव्हाण सुमित अहिराव चार्ली शिंपी नाना भांडारकर गिरीश देवरे मयूर शिंपी सुमित अहिरराव हेमंत शिंपी इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले
