जळगाव मिरर | २० जून २०२४
टेलिग्राम व व्हॉटसअॅपच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देवून त्या बदल्यात नफ्याचे अमिष दाखवत विशाल रामराव सुर्यवंशी (वय २७, रा. चाळीसगाव) यांची १२ लाख ७९ हजार ३७५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना दि. १० मे ते दि. १८ जून दरम्यान घडली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहरात खासगी नोकरी करणारे विशाल सुर्यवंशी यांना दि. १० मे रोजी टेलिग्राम तसेच व्हॉटस्अॅपवर मॅसेज करून टास्क पूर्ण करण्यास सांगितले यावेळी विशाल यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने रक्कम स्वीकारली. यात त्यांना एक लाख ५३ हजार ३२ रुपये परतावा दिला. त्यात विश्वास संपादन करून रक्कम स्वीकारतच राहिले. अशा प्रकारे एकूण १४ लाख ३२ हजार ४०७ रुपये स्वीकारले. त्यातील केवळ एक लाख ५३ हजार ३२ रुपयेच परत मिळाल्याने विशाल यांची १२ लाख ७९ हजार ३७५ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. त्यांनी दि. १८ जून रोजी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
