• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सत्संग कार्यक्रमात घडला मृत्यूचा थरार : ११६ भाविक मृत्युमुखी तर शेकडो जखमी

जळगाव मिरर | ३ जुलै २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 3, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
सत्संग कार्यक्रमात घडला मृत्यूचा थरार : ११६ भाविक मृत्युमुखी तर शेकडो जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जुलै २०२४

देशातील उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यात आयोजित नारायण साकार विश्व हरी ऊर्फ भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात मंगळवारी चेंगराचेंगरी झाली. अन् अक्षरशः मृत्यूचे तांडव घडले. या दुर्दैवी घटनेत ११६ हून अधिक भाविक मृत्युमुखी पडल्याची पुष्टी अलिगडच्या आयुक्तांनी केली. मृतांमध्ये बालके व महिलांचा समावेश आहे. या घटनेत २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी व रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा अक्षरशः खच पडल्याचे पहायला मिळाले. घटनास्थळावरील हृदयद्रावक दृश्ये पाहून एका पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली.

सविस्तर वृत्त असे कि, यूपीच्या हाथरस जिल्ह्यापासून ४७ किमी दूरस्थित फुलरई गावात मानव मंगल मिलन समागम समितीने नारायण साकार विश्व हरी नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबा यांचे सत्संग (प्रवचन) ठेवले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने गावात दाखल झाले. कार्यक्रमास्थळी प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा कैक पट अधिक सुमारे ५० हजार भाविक जमले. सत्संग संपल्यानंतर भाविक परत जात असतानाच अचानक चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या वेळी एकमेकांना पायदळी तुडवत लोक पुढे गेले.

त्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ माजली- दुर्दैवाने महिला व बालकांसह अनेकांना प्राण गमावला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. चेंगराचेंगरीत जखमी व बेशुद्ध झालेले तथा मृत्युमुखी पडलेल्यांना ट्रक, ट्रॅक्टर व बस यासह मिळेल त्या वाहनाने तातडीने एटा जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. काहींना जवळच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. पण, रस्त्यातच अनेक जखमींची प्राणज्योत मालवली. त्यामुळे रुग्णालयासमोर अक्षरशः मृतदेहांचा सडा पडल्याचे विदारक दृश्ये पहायला मिळाले. अनेक जखमींची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हाथरसमधील चेंगराचेंगरीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केले.

Related Posts

२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी
क्राईम

२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी

November 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू
क्राईम

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!
क्राईम

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी

२५ वर्षीय विकीचा दुर्दैवी अंत : रेल्वेच्या खड्ड्यात दुचाकी आदळली; दोन मित्र जखमी

November 3, 2026
भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group