
जळगाव मिरर | ३ जुलै २०२४
देशात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून नेहमीच अत्याचार व खुनाच्या घटना सातत्याने घडत असतांना एक थरारक घटना बिहार राज्यातील सारण जिल्ह्यात घडली आहे. लग्नास नकार दिल्याने एका डॉक्टर महिलेने प्रियकराच गुप्तांग कापून टॉयलेटमध्ये टाकल्याची घटना घडली आहे. हि घटना १ जुलै रोजी घडली असून जखमी प्रियकरावर पाटणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर महिलेला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला डॉक्टर असून माधोरा येथे नर्सिंग होम चालवते. तर पीडित तरूण त्याच प्रभागातील नगरसेवक आहे. दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले होते. मात्र पीडित तरूण लग्न करण्यास नकार देत होता. शेवटी आरोपी महिलेने त्याला नोंदणीकृत विवाहासाठी तयार केले. यानंतर ती लग्नासाठी कोर्टात पोहोचली. मात्र तो न्यायालयात आलाच नाही. यानंतर तिने त्याला घरी बोलावले, घरी पोहोचल्यानंतर महिलेने रागाच्या भरात प्रियकराचे गुप्तांग कापले.
आरोपी महिला डॉक्टर असून माधोरा येथे नर्सिंग होम चालवते. अभिलाषा असे या महिलेचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याच प्रभागातील नगरसेवकासोबत तिचे प्रेमसंबंध होते. यादरम्यान तिचे आणि नगरसेवक प्रियकरामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि ती गर्भवती राहिल्याचा दावा तिने केला आहे. लग्नाच्या अमिषाने प्रियकराने फसवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे. त्यानेच तिला कोर्ट मॅरेज करू असे सांगितले होते. पण नंतर लग्न करण्यास नकार दिल्याने संतप्त महिलेने चाकूने पीडित तरूणाचे गुप्तांग कापले. यानंतर प्रियकर जोरजोरात रडू लागला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक डॉक्टरच्या घरी पोहोचले. त्यांनीच त्याला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी मधौरा पोलिस स्टेशनचे एसएचओ यांनी सांगितले की, महिला हाजीपूरची रहिवासी आहे. ती माधोरा येथे सराव करायची. पीडित महिला आणि आरोपी तरूण दोघेही अविवाहित आहेत. महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.






















