• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उरण, शिळ फाटा महिला अत्याचारांच्या घटनांविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 31, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
उरण, शिळ फाटा महिला अत्याचारांच्या घटनांविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ जुलै २०२४

राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे परंतु दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे गेल्या महिन्या भरात उरण आणि शिळफाटा येथे महिलांवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा निर्दयपणे खुन करण्यात आल्याचा घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असुन गृहखात्याच्या इभ्रत वेशीवर टांगली गेली आहे.

महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आणि घटनांमधील आरोपींना फाशीशी शिक्षा मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने बुधवार दि ३१ जुलै २०२४ रोजी राज्यभरात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबद्दल माहिती देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या की, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे आली. या योजने अंतर्गत राज्यातील पात्र माता भगिनींना दरमहा १५०० रूपये देण्यात येणार आहेत. गेल्या दहा वर्षात वाढलेली महागाई वाढलेले गॅस सिलेंडरचे दर यामुळे महिलांना घर खर्च भागवण्यासाठी कसरत करावी लागत आहे आता सरकार महिलांना दरमहा १५०० रुपये देणार आहे त्यामुळे महिलांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे परंतु एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डंका वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे गेल्या महिन्यात उरण आणि शिळफाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि राज्यातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दर्शवनाऱ्या आहेत.
यात नवी मुंबईतील उरण येथील एका बावीस वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने निर्दयीपणे पिडितेच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन तिचे हाल हाल करून तिला मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न करून तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केल्याचे निदर्शनास आले आहे. तर दुसऱ्या घटनेत बेलापूर येथील तीस वर्षीय महिला घरगुती भांडण झाल्याने मानसिक शांतता मिळावी म्हणून डायघरजवळील शीळ फाटा येथील गणेश घोळ मंदिरात गेली होती. येथे  मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी या पीडितेला चहातून गुंगीचे औषध देऊन या पीडितेवर आळीपाळीने बलात्कार करत तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या दोन्ही घटना अत्यंत अमानवीय आणि निर्दयी आहे.

या घटनांमुळे राज्याचे गृह खाते निद्रिस्त असुन राज्यात महिला असुरक्षित असल्याचे जाणवत असून या घटनांमुळे राज्याच्या गृह खात्याची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. या दोन्ही घटना क्रुरतेचा कळस गाठणाऱ्या असुन निषेधार्ह आहेत या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि निद्रिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागे करण्यासाठी व घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून घटनेतील विकृत मानसिकतेच्या पाषाण हृदयी आरोपींना लवकरात लवकर फाशीशी शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे बुधवार ३१ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ वा राज्यभरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रोहिणी खडसे यांनी दिली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्या महिला भगिनी समवेत समाजातील सर्व महिला भगिनींनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन रोहिणी खडसे यांनी केले आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group