जळगाव : प्रतिनिधी
८ वी नरेंद्राशिष जळगाव प्रीमियर लीग लेदार बॉल क्रिकेट टूर्नामेंट-२०२२ चे विजेतेपद जगद्गुरु महर्षी वाल्मिक ग्लॅडिटियर्स संघाने मोरया फायटर्सला नमवून पटकवले.
तत्पूर्वी माननीय नगरसेवक श्री. भरतभाऊ सपकाळे यांच्या जगद्गुरु महर्षी वाल्मिक ग्लॅडिटियर्स संघाने अनुक्रमे नोमन क्लब चॅम्पियन, जय महाराष्ट्र ह्या संघाना पराभूत करत अंतिम सामन्यात पदार्पण केले. अंतिम सामना जय महाराष्ट्र सोल्जर्स या बलाढ्य संघासमोर होता. तरीही आपल्या तंत्रशुद्ध खेळाच्या आधारे विश्वा ह्या फलंदाजाने जगद्गुरु महर्षी वाल्मिक ग्लॅडिटियर्स ह्या संघाला नाबाद २५ धावा करत विजयश्री मिळवून दिली. मोरया फायटर्स तर्फे एकमेव यश जोशी हा यशस्वी ठरला. त्याने मोरया संघाकडून ३ गडी बाद केले.
अंतिम सामन्यानंतर नरेंद्राशिष जळगाव प्रीमियर लीगचे मुख्य प्रयोजक राहुल सोनवणे, नगरसेवक इब्राहिम पटेल, नगरसेवक भरत सपकाळे, प्रथम पारितोषिक देणारे रोहित तलरेजा, द्वितीय पारितोषिक देणारे अशफाक शेख , महाराष्ट्र टी-१० चे सचिव पंकज महाजन सहसचिव सतनाम सिंग बावरी, प्रशिक्षक योगेश महाजन, विवेक पाटील ह्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर पाटील ह्यांनी केले. तसेच आयोजक अध्यक्ष निलू सपकाळे ह्यांनी आभार व्यक्त केले.