जळगाव मिरर | ३ सप्टेबर २०२४
यावल तालुक्यातील चिंचोली या गावातील भवानी पेठ मध्ये असलेल्या दुकानदाराकडून अन्न औषध खात्याचे अधिकारी असल्याचे सांगत तुम्ही गुटखा विकतात म्हणुन दोघांनी ५० हजाराची खंडणी घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघ ठगांना अटक केली असून यामध्ये गावातीलच एका मास्टमाईंट असल्याचे उघड झाले आहे. त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. अटकेत असलेल्या दोघांना दि. ५ रोजी पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चिंचोली गावतील भवानी पेठ मध्ये संतोष हरी बडगुजर यांचे किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानात दि. ७ जुलै रोजी आकाश भगवान जावरे (वय २९ रा.आंबेडकर चौक, नंदुरबार) व राहुल श्रीहरी काळे (वय ४३ रा कात्रज, पुणे) हे दोन जण गेले होते. त्यांनी आम्ही अन्न, औषध खात्याचे अधिकारी आहोत तुम्ही दुकानात गुटखा विकतात म्हणून तुमच्या विरुद्ध कारवाई करायची आहे. तसेच तुमच्या मुलाला व पत्नीला अटक करायची असून त्यांना दम दिला. तुम्हाला अटक टाळायची असेल तर दोन लाख रूपयांची खंडणी मागितली. तेव्हा संबंधित दुकानदाराने त्यांना ५० हजार रुपये दिले आणि ते तिथून निघून गेले. दरम्यान, शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी ते दोघे गावात आले आणि त्यांनी परत दुकानदाराकडे पैशाची मागणी केली. दुकानदाराने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर याचा मुख्यसूत्रधार हा गावातील समाधान धनगर हा असल्याचे समोर आले. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायधिश एस. व्ही. जंगमस्वामी यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वाढीव कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.