जळगाव मिरर | ५ सप्टेबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय वातावरण तापले असतांना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या राज्यातील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून यावेळी त्यांनी मोदी सरकारवर चांगलीच टीका केली आहे.
खा.राहुल गांधी म्हणाले कि, गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तेथे कायम तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आलं होतं. आता या ठिकाणची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आणि पूर्वपदावर येत आहे. आता या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी हे आक्रमक झाले आहेत.या भाषणावेळी राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. “त्यांना जातीची चौकट राहिली पाहिजे असं वाटतं. त्यांना द्वेष पसरवायचा आहे. हिंसा भडकवायचे आहे. एका धर्माला दुसऱ्याच्या बद्दल भडकवत आहेत”, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
“मी खरगेंना म्हटलं मी तुमच्यासोबत कर्नाटकात जातो तुम्ही आनंदी होता. विमानातून उतरताच तुमच्या चेहऱ्यावर हास्य असतं. पण तुम्ही महाराष्ट्रात आल्यावर अधिक खूश होता. तुमच्या चेहऱ्यावर हास्य असते. ते म्हणाले, राहुल महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा रुजलेली आहे. त्यामुळे मी आल्यावर मला आनंद होतो. या ठिकाणी काँग्रेस, फुले, शाहू, शिवाजी महाराज आणि आंबेडकरांची विचारधारा आहे. त्यामुळे इथे आल्यावर जेवढा आनंद होतो, तेवढाच कर्नाटकात आल्यावरही होतो. मलाही तोच आनंद होतो”, असे राहुल गांधी म्हणाले.
तुमच्या डीएनएमध्ये काँग्रेस आहे. आज लढाई विचारधारेची आहे. देशात पाहत आहात. पूर्वी राजकारण व्हायचं. आज भारतात विचारधारेचं युद्ध सुरू आहे. एकीकडे काँग्रेस आणि आपले महापुरुष, दुसरीकडे भाजप. आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचं. पण त्यांना काही लोकांचा फायदा करायचा आहे. दलित दलित राहिले पाहिजे, मागास मागास राहिले पाहिजे. आदिवासी आहे तसेच राहिले पाहिजे. जातीची चौकट राहिली पाहिजे असं त्यांना वाटतं. त्यांना द्वेष पसरवायचा आहे. हिंसा भडकवायचे आहे. एका धर्माला दुसऱ्याच्याबद्दल भडकवत आहेत. मणिपूर सिव्हिल वॉर सारखं झालं आहे. दीड वर्ष झाले पण पंतप्रधान तिकडे गेले नाहीत. जाऊच शकत नाही. कारण भाजपच्या लोकांनी तिकडे आग लावली, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.