मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. तुमच्या स्वभावामुळे इतरांचे मन दुखावू नका. समोरच्या व्यक्तीच्या वागण्यात बदल झाल्याने आश्चर्य वाटेल. कोणतेही अनपेक्षित काम करु नका. व्यापारी वर्गाला नफा होईल. आर्थिस लाभासोबत सार्वजनिक व्यवहारात वाढ होईल. कुटुंबाच्या सुखासाठी त्याग कराल.
वृषभ – आजच्या दिवसात तुमचे नुकसान होईल. तुमचे कुणाशीही पटणार नाही. कामामध्ये जास्त रस राहाणार नाही. त्यामुळे गोंधळ उडेल. पैशाशी संबंधित व्यवहार किंवा गुंतवणूक आज करु नका. आर्थिक अडचणींसाठी तुम्हाला सामोरे जावे लागेल. नोकरदार लोकांना टोमणे ऐकावे लागतील. घरामध्ये काही घटना घडतील ज्यामुळे नुकसान होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
मिथुन – आज तुमच्या स्वभावात आळशीपणा राहिल. कोणतेही काम कराल त्यात यश नक्की मिळेल. घरातील कामे आणि व्यवसायातील कामे एकाच वेळी करताना अडचणी येतील. वडिलधाऱ्यांच्या मदतीने तुम्ही अनेक गोष्टीमधून मुक्त व्हाल. नोकरी- व्यवसायातील योजनेबाबत अस्वस्थ राहाल. संयमाने काम करावे लागेल. घाईने निर्णय घेणे टाळा. तब्येतीत चढ-उतार होतील.
कर्क – आज तुम्ही कामात यशस्वी व्हाल. आळशीपणा वाढेल, अन्यथा हानी होईल. कार्यक्षेत्रात परिस्थिती अनुकूल राहिल. आर्थिक लाभ होतील. नोकरदार लोक योजनांवर काम सुरु करतील. योग्य दिशेने काम केल्यास भविष्य सुरक्षित होईल. सरकारकडून उदारता राहिल. घरात सुख-शांती राहिल.
सिंह – आज तुमचा स्वभाव दानशूर होईल. दुसऱ्याची अडचण पाहून तुमचे मन दुखावेल. तुमची फसवणूक होऊ शकते, त्यासाठी सावध राहा. महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण कराल. तुमच्या कामातील अडथळे आज पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या तुम्ही समाधानकारक असाल. महिलांना पैशाची चिंता सतावेल. इच्छा पूर्ण न झाल्याने संघर्ष वाढेल. तब्येत बिघडू शकते.
कन्या – आजचा दिवस प्रतिकूल असेल. प्रकृतीत बिघाड होईल. कामातून कमी अपेक्षा करा. काम कमी केल्याने नफा मिळेल. आज तुमच्या खर्चात अचानक वाढ होईल. फालतू खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा काम बिघडेल. धार्मिक कार्य कराल.
तूळ – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. आज तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल. परिणाम निराशाजनक नसतील. कोणत्याही कामातून तुम्हाला फायदा होईल. पैशाची आवक समाधानकारक राहिल. कामाच्या ठिकाणी कुणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. मनातील विपरीत विचार टाळा.
वृश्चिक – आज तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल. आरामदायी जीवन जगण्यावर भर द्याल. घरगुती गरजांवर पैसे खर्च कराल. व्यवसायाची गती मंद असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुणावरही जास्त अवलंबून राहू नका, नुकसान होऊ शकते. वडीलधाऱ्यांकडून मोलाचा सल्ला मिळेल.
धनु – आजचा दिवस तुम्हाला फारसा लाभदायक नसेल. भविष्यात यशाचा मार्ग खुला होईल. दिवसाची सुरुवात संथ गतीने होईल. सर्व कामे नियमित वेळेवर पूर्ण होतील. तुमच्या काम आणि व्यवसायाबाबत अधिक गंभीर असाल. कामासाठी प्रवास करावा लागेल. पैशांमुळे मन निराश राहिल. कामात समाधानी असाल. भविष्याबद्दल चिंता सतावेल.
मकर – आजचा दिवस सामान्य राहील. भुतकाळातील चुकीच्या वागणूकीचा पश्चाताप होईल. व्यवसायात मेहनतीचा फायदा कमी होईल. आर्थिक उत्पन्न कमी राहिल. नोकरदार लोक त्यांच्या आळशी वर्तनामुळे कार्यक्षेत्रात समस्या निर्माण करतील. पोट खराब होईल.
कुंभ – आजचा दिवस अनुकूल असेल. काम आणि घरामुळे गुंता वाढेल. योजना योग्य दिशेने वाटचाल करतील. व्यक्तिमत्त्वाच्या बळावर समाजाकडून सन्मान मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. काटकसरीने बचत करण्यात यशस्वी व्हाल. जोखमीची कामेही अनपेक्षित फायदे देतील. आर्थिक बाबतीत कुटुंबाला मदत कराल. शारीरिक वेदना सतावतील.
मीन – आजचा दिवस शांततेत जाईल. दिवसाची सुरुवात चांगली असेल. तुम्हाला आज आनंदाची बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात फायदेशीर व्यवहार कराल, ज्यातून तुम्हाला अपेक्षित नफा मिळणार नाही. उत्पन्न खर्चापेक्षा जास्त राहिल. तुमच्या वागण्यामुळे लोक आकर्षित होतील. आरोग्याची काळजी घ्या.