• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : कासव सांगत बालकांना विहिरीत ढकलले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 21, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
खळबळजनक : कासव सांगत बालकांना विहिरीत ढकलले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१  सप्टेंबर २०२४

राज्यातील अनेक ठिकाणी खळबळजनक घटना घडत असतांना नुकतेच नाशिक जिल्ह्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. कासव असल्याचे सांगत तीन बालकांना विहिरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे घडला आहे. सुदैवाने या तीनही बालकांचे प्राण वाचल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून, हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तिघा संशयितांविरोधात सिन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकरणाचे गूढ शुक्रवारी उलगडले.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पिंगळा येथे नाशिक कारखाना रस्त्यावर अमोल रामनाथ लांडगे आणि संतोष घुगे वास्तव्यास आहेत. याच परिसरात नाना भाऊ सानप यांची विहीर आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास या विहिरीजवळ विक्रम नारायण माळी आणि साईनाथ शिवाजी ठमके थांबलेले होते, तर वरद संतोष घुगे (१३), अथर्व संतोष घुगे (९) आणि त्यांचा मित्र आदित्य सानप (१३) हे तिघे अंगणात खेळत होते. या वेळी आपण कासव आणू या, असे सांगत अमोल लांडगे याने वरद, अथर्वला घेऊन विहीर गाठली. त्यांच्या पाठोपाठ आदित्यही तेथे आला. विक्रम माळी व साईनाथ ठमके यांनी या विहिरीत कासव असल्याचे सांगितले. ते पाहण्यासाठी वरद, अथर्व आणि आदित्य विहिरीत वाकून बघत असतानाच विक्रम व साईनाथ यांनी तिघांनाही विहिरीत ढकलत पळ काढला.

वरद व अथर्वचे आई-वडील संतोष घुगे व दीपाली घुगे यांचे शिंद येथे महा ई-सेवा केंद्र असल्याने रात्री उशिरा ते घरी परतले. तोपर्यंत दोन्ही मुले झोपी गेली होती. शेजारी राहणाऱ्या आदित्यने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. आदित्यच्या आईने घुगे यांच्या घरी येत त्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. गुरुवारी सकाळी घुगे आणि सानप कुटुंबाने एकत्र येऊन पोलीस पाटील सागर मुठाळ यांच्याशी संपर्क साधला. या प्रकरणी दीपाली संतोष घुगे यांनी सिन्नर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून कट रचून मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमोल रामनाथ लांडगे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यास अटक करण्यात आली आहे. दोनही फरार संशयितांचा शोध सुरू आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रूपाली चव्हाण करीत आहेत.

संशयितांनी विहिरीत ढकलून दिल्यानंतर खाली कोसळत असतानाच वरदचा हात विहिरीत विद्युतपंप, पाइप, केबल यांना बांधलेल्या दोरखंडाच्या जाळ्यात अडकला. प्रसंगावधान राखत वरदने दोरखंडाला धरून स्वतःचा जीव वाचवत अर्थव आणि आदित्य यास विहिरीबाहेर काढले. बाहेर आल्यानंतर वरदने अमोलला फोन करून तुम्ही आम्हाला कासव आणायला पाठवले, त्या माणसांनी आम्हाला विहिरीत ढकलून दिले, असे सांगितले. त्यावर अमोल लांडगे याने झाला प्रकार कुणाला सांगू नका, असे धमकावले. त्यानंतर मुले कपडे बदलून झोपी गेली.

Related Posts

marhan
क्राईम

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक
क्राईम

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

June 4, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !

“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !

June 4, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

June 4, 2026
marhan

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

June 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group