जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२४
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडत असतांना नुकतेच पुणे शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी दोन दिवसांपूर्वी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेते. त्याच महाविद्यालयात आरोपी ११वी, १२वीचे शिक्षण घेत आहेत. त्यातील एकाने पीडितेला पार्टीसाठी म्हणून आरोपींपैकी एकाच्या फ्लॅटवर नेले. तेथे गेल्यावर आरोपींनी ड्रगचे सेवन केले आणि तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या पीडितेने ही बाब घरच्यांना सांगितली. तिच्या पालकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेतली.
