जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२४
नारीशक्ती बहुद्देशीय संस्थे तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन आज दिनांक 26सप्टेंबर रोजी गुरुवारी सकाळी 9ते 11 या वेळेत समता नगर साईबाबा मंदिरा जवळ जळगाव येथे संपन्न झाले. या शिबिरात 75 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
नेत्र तपासणी शिबिरात नेत्ररोग तज्ञ डॉ रेणुका चव्हाण यांनी डोळ्यांची तपासणी केली. व गरजू रुग्णांना योग्य असा मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांनी डोळ्यांची काळजी व निगा याबाबत माहिती सांगण्यात आली. डॉ रेणुका चव्हाण यांनी रुग्णांना डोळ्यांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी सुमन पाटील सिस्टर व रुपालीताई बावीस्कर, कृष्णा सखी महिला वस्ती संघ यांचे अनमोल सहकार्य लाभले. यावेळी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मनिषा पाटील, नूतन तास खेडकर, माधुरी शिंपी, रूपाली बाविस्कर, किमया पाटील, हर्षा गुजराती, रेणुका हिंगू, शिल्पा बयास, वंदना मंडावरे,आशा मौर्य, वर्षा मौर्य, व पदाधिकारी यांचेही अनमोल सहकार्य लाभले. नारीशक्तीचा या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.