जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२४
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून खासगी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी बेकायदेशीररित्या साठा करणाऱ्या सादीक सिराज पिंजारी (वय ४१, रा. शिरसोली प्र.न. ता. जळगाव) याच्यावर एलसीबीच्या पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून ७३ गॅस सिलेंडरसह रिक्षा असा एकूण पाच लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवार दि. २९ सप्टेंबर दुपारी शिरसोली प्र.न. ता. जळगाव येथे करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील सादीक पिंजारी याने त्याच्या राहत्या घराच्या कुंपनामध्ये विविध कंपनीचे घरघुती व व्यवसायिक गॅस सिलिंडर खासगी वाहनामध्ये गॅस भरण्यासाठी बेकायदेशीररित्या साठा करून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी दुपारी शिरसोली येथे पोहचले. त्यावेळी असता गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवल्याचे आढळून आले. पथकाने कारवाई करीत तेथून एकूण ७३ घरघुती व व्यावसायिक सिलिंडर तसेच सिलिंडर ठेवलेली रिक्षा (क्र. एमएच १९, बीएम २७८४), गॅस भरण्याची मशीन, नळ्या असा एकूण पाच लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सादीक पिंजारी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउप दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अधिकार पाटील, पोहेका विजय पाटील, हरिलाल पाटील, पोकॉ प्रदीप चवरे, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे, शुद्धोधन ढवळे यांनी केली.