जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२४
शहरातील एका भागात राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका भागात २६ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे कौटुंबिक कारणावरून त्यांच्या पतीसोबत नेहमी भांडण होत असल्याचा गैर फायदा घेवून संशयित आरोपी तुषार राजेंद्र अहिरे (वय २८) याने विवाहितेला सांगितले की, पतीला घटस्फोट देवून मी तुझ्याशी लग्न करेल असे सांगून तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर अत्यावर केला. हा प्रकार मे २०१८ पासून सुरु होता.
त्यानंतर या अत्याचारातून विवाहिता गर्भवती झाली. त्यानंतर त्याने विवाहितेसोबत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकारानंतर विवाहितेने बुधवारी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी तुषार राजेंद्र अहिरे यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी तुषार अहिरे याला अटक करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे करीत आहे.