• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

उद्योगजगत शोकाकुल : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2024
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
उद्योगजगत शोकाकुल : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२४

देशातील ख्यातनाम उद्योजक, भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेले उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने उद्योगजगतातील लखलखता ध्रुवतारा निखळला आहे. टाटा समूहाचा संपूर्ण कारभार सांभाळणार्‍या टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी खास निवेदन जारी करत ही दु:खद वार्ता दिली. या वार्तेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 1937 मध्ये मुंबईत जन्म झालेले रतन टाटा हे नाव भारताच्या घराघरांत विश्वासाचे प्रतीक म्हणून घेतले जाते. त्यांच्या निधनाने उद्योगजगताचा लखलखता ध्रुवतारा निखळून पडला आणि ऐन सणासुदीच्या दिवसांत उद्योगजगत शोकाकुल झाले.

गेल्या सोमवारी पहाटे रक्तदाब कमी झाल्याने रतन टाटांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर चिंता व्यक्त होऊ लागली आणि रुग्णालयाकडून कोणतेही निवेदन येत नसल्याने प्रत्येकाच्या मनात काहूर उठले होते. ते लक्षात घेऊन स्वत: रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामसह सामाजिक माध्यमांवर पोस्ट शेअर करत रतन टाटा यांनी आपण ठणठणीत असल्याचे सांगितले होते. वयोमानानुसार वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल झालो असून, काळजीचे कारण नाही, असे आश्वस्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनदेखील त्यांनी केले होते. त्यानंतर मात्र त्यांच्याकडून कोणतीही पोस्ट आलेली नाही. आपली तब्येत चांगली आहे, हे सांगणारी त्यांची पोस्ट शेवटची ठरली.

मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस टाटा समूहाकडून किंवा ब्रिच कँडी रुग्णालयाकडूनही कुठलीच माहिती दिली गेली नव्हती. त्यातच बुधवारी ‘रॉयटर’सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने रतन टाटांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी दिली आणि सर्वांच्याच मनात धस्स झाले. शंकेची पाल चुकचुकली. ही कुशंका दुर्दैवाने रात्रीच खरी ठरली. रतन टाटांचे देहावसान झाले ही बातमी जाहीर करताना टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन आपल्या निवेदनात म्हणतात, टाटा समूहासाठी रतन टाटा हे अध्यक्ष असण्याच्याही पलीकडे खूप काही होते. ते माझे पालनहार, मार्गदर्शक आणि मित्रही होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाचा जागतिक विस्तार झाला आणि स्वत:मध्ये आत्मसात केलेली नैतिक अनुकंपा जपत त्यांनी हे यश कमावले. समाजसेवेला समर्पित असलेल्या टाटांचा हा स्पर्श लाखो लोकांच्या आयुष्यालाही झाला. शिक्षणापासून आरोग्यसेवेपर्यंत अनेक पिढ्यांना लाभदायक ठरेल असे काम त्यांनी उभे केले. रतन टाटांनी अंगीकारलेली तत्त्वे समोर ठेवून आम्ही यापुढेही वाटचाल करत राहू, असा शब्दही चंद्रशेखरन यांनी दिला आहे.

Related Posts

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा
जळगाव

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा
जळगाव

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group