
जळगाव मिरर | १३ ऑक्टोबर २०२४
जळगाव शहरातील प्रत्येक परिसरातील नागरिकांना तात्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी जळगावकर नागरिकांच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल केली आहे.
जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी जळगावकरांच्या आरोग्याची काळजी घेत शहरातील प्रत्येक कॉलनी व परिसरात रुग्णवाहिका जाऊ शकते. त्या ठिकाणी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन जिल्हाध्यक्ष इंजि. राहुल सोनवणे यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका दाखल केली आहे. या रुग्णवाहिकेचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळेस माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, इंजि. राहुल सोनवणे, हितवर्धन सोनवणे, शैलेंद्र सोनवणे, डॉ.क्षितिज भालेराव यांची उपस्थिती होती.





















