जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवाराचे महाविकास आघाडी सोडली तर सर्वांचे उमेदवार जाहीर झाले असून गेल्या अनेक वर्षापासून महायुतीमधील नेते महाविकास आघाडीला घराणेशाहीचे राजकारणाचा आरोप करीत असतांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी केवळ विरोधकच नाही तर महायुतीमधील भाजपसह मित्रपक्षांमध्ये घराणेशाही दिसून येत आहे.
शिवसेना शिंदे गटाच्यावतीने मंगळवारी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 45 जणांना संधी देण्यात आली आहे. यातील अनेक उमेदवारांचे वडील, पती अथवा भाऊ विद्यमान आमदार किंवा माजी मंत्री आहेत. यात प्रामुख्याने एरंडोल मतदारसंघांमध्ये घराणेशीतून तिकीट दिल्याचे दिसून येते. एरंडोल मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली असून शिवसेनेचे नेते आ.चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल चिमणराव पाटील यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. आता ते महाविकास आघाडीवर घराणेशाहीवर आरोप करू शकत नाही.
