जळगाव ः प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली येथून जवळच असलेल्या राजपाल नगर येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज 20 रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेची चौकशी एमआयडीसी पोलिसांनी सुरु केली असून याप्रकरणी चौकशीसाठी महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची खात्रीलायक वृत्त आहे. त्यानंतर या महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छदेनासाठी पाठविण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शिरसोली जवळ असलेल्या राजपाल नगरात नबाबाई भाऊलाल भिल(वय 32) या आपल्या पती व सहा मुली, एक मुलगा यांच्यासह वास्तव्यास आहे. महिला व तीचा पती जैन व्हॅली येथे मजूरी करून आपल्या कुटूंबांचा उदरनिर्वाह करतात. दि.19 जून रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास पती व पत्नी शिरसोली येथे जावून बाजार करून रात्री घरी आले. तर भाऊलाल हा रात्री दारु पिऊन उशिरा घरी आला. हे सातही मुले आपल्या आजी तेजाबाई भिल यांच्याकडे गेले. त्यामुळे घरामध्ये नबाबाई व भाऊलाल हे दोघे पती – पत्नी होते. त्यावेळी नबाबाई हे रात्री स्वयंपाक घरात खाली पडले की त्यांना मारहाण झाली हे मात्र अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही. जेव्हा सकाळी पती भाऊलाल यांना जाग आली तेव्हा नबाबाई ह्या स्वयंपाक घरात पडलेल्या दिसल्या त्यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. यावेळी पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला कळविले.
तत्काळ घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह एमआयडीसी पोलिस स्थानकाचे पोनि.प्रताप शिकारे, एपीआय अमोल मोरे, पीएसआय दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, हे.कॉ.रतीलाल पवार, सचिन मुंडे यांच्यासह पोलिस पथक याठिकाणी दाखल झाले होते.