शेंदुर्णी ता.जामनेर :प्रतिनिधी
विश्व हिंदु परिषद अंतर्गत दुर्गावाहिणी व मातृशक्ती आयोजित शोर्य प्रात्यक्षिक कार्यक्रम१८ जुन 2022, रविवार रोजी शेंदुर्णी येथे पार पडला. प्रत्येक वर्षी विश्व हिंदु परिषद अंतर्गत दुर्गावाहिणी चा शोर्य प्रशिक्षण वर्ग घेतला जातो. वर्गामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दूर्गांचे प्रात्यक्षिक आज या कार्यक्रमात सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दुर्गावाहिणी शेंदुर्णी प्रखंड संयोजिका कु. माधुरी ताई सोनवणे यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सुरूवात त्रिवार ओंकार, रामधुन व एकात्मता मंत्राने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेंदुर्णी प्रखंड सत्संग प्रमुख शितल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला वि.हि. प. भुसावळ जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, प्रांत समरसता प्रमुख वामन फासे, दुर्गावाहिनी भुसावळ जिल्हा संयोजिका अॅड. स्नेहल विसपुते वि. हि. प. जळगाव जिल्हासहमंत्री अॅड.श्रीराम बारी, बजरंग दल जिल्हा संयोजक प्रतिक भिडे, शेंदुर्णी भाजपा नगराध्यक्षा विजया खलसे इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रात्यक्षिकाच्या मुख्य शिक्षिका शेंदुर्णी शहर संयोजिका लोचाना चौधरी ह्या होत्या. कोमल अशोक चौधरी, मयुरी भगवान चौधरी, वैष्णवी नागणे, जयश्री चौधरी, नेहा बडगुजर, आकांक्षा गवळी, वेदिका पारळकर, भाग्यश्री पाटिल, नेहा गुजर, मानसी गुजर, पल्लवी शेटे, साक्षी चौधरी, निशा चौधरी, मानसी गुजर, समृद्धी भेरडे, मोहिनी सूर्यवंशी यांनी प्रात्यक्षिक सादर केले. अॅड. स्नेहल विसपुते यांनी मार्गदर्शन केले. स्मिता शेटे यांनी अभार प्रदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाला रंजना धुमाळ, मेघना धुमाळ, भिका इंदरकर, अतुल पाटिल, प्रविण सुशीर, घनशाम माळी, अर्जुन वाघ, लोकेश पाटिल, कल्पेश जोशी, विवेक वाघ, महेंद्र पाटिल, अमृतबापू खलसे, श्रीकृष्ण चौधरी, नितीन शेटे यांचे सहकार्य लाभले.