भडगाव :प्रतिनिधी
येथील रहिवासी व धुळे जिल्हयातील शिरपुर, येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मुस्तफा मिर्झा यांनी एका खासगी दूरचित्रवाणीवरील सामान्य ज्ञानावर आधारित “कोण होणार करोडपती” या कार्यक्रमात तब्बल साडे बारा लाख रुपये जिंकले. है पैसे ते भडगाव शहरातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांसाठी अभ्यासिका उभारणीच्या कामासाठी खर्च करण्याचा संकल्प त्यांनी बक्षिस घेताना व्यक्त केला.
मुस्तफा मिर्झा हे अतिशय सामान्य परिस्थितीतून अभ्यास, जिद्द व चिकाटी या गुणांनी पी.एस.आय या पदावर पोहोचले आहेत. त्यांचे एक बंधू कालवा निरीक्षक तर दुसरे पोलिस आहेत. ‘मुस्तफा मिर्झा यांच्या यशाबद्द्दल कौतुक करणारे होर्डिस गावात ठिकठिकाणी लावलेले दिसून आले.तर सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशाबद्दल अनेक मान्यवरांनी, सामान्य भडगावकरांनी त्यांचा सत्कार व कौतुक केले.