यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील अट्रावल येथे प्रेमविवाह झालेली पत्नी माहेरी असल्याने पती-पत्नीत भांडणे झाल्याचा राग येऊन मित्राला सोबत घेऊन पतीने २० जूनच्या मध्यरात्रीनंतर पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. यात त्याची सासु व पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. यावल पोलिसात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत यावल पोलिसात अर्जुन सुरेश भिल याने फिर्याद दिल्या नुसार त्यांची मुलगी योगिता हिचा दोन वर्षापूर्वी भुसावळ येथील खुषाल उर्फ बंटी गजानन बोरसे सह प्रेमविवाह झाला होता. प्रेम विवाहानंतर तिला एक मुलगी झाली. भाऊचे लग्न असल्याने ही माहेरी अटरावल येथे गेल्या आठ महिन्यापसून राहात होती. तीन जून रोजी भाऊ चे लग्न झाले या प्रेम विवाह केलेला पती खुशाल उर्फ बंटी हा सुद्धा आलेला होता त्याचे त्याची पत्नी योगिता हिच्याशी भांडण झाले. त्यामुळे तो योगिताला आणि त्याची लहान बाळ तिला सोडून भुसावळ येथे निघून गेला. नंतर त्याने योगिताला शिवीगाळ मोबाईल द्वारे केली.
२० जून रोजी मध्यरात्रीनंतर खुषाल उर्फ बंटी हा त्याचा मित्र अरविंद कांबळे याला घेऊन आठवले त्याला झोपेत असलेली त्याची पत्नी योगिता त्यावर त्याने धारदार शस्त्राने वार केले असता डोक्याजवळ व नाकाजवळ तिला गंभीर दुखापत झाली. याची जाऊन त्याची सासू अंजुबाई हीच लागल्याने तिला सुद्धा त्याने धारदार शस्त्राने वार केले व तिलाही जखमी केले. दोघे मायलेकींना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असता त्यांच्यावर उपचार करून त्यांना त्वरित जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
घटनेची फिर्याद अर्जुन यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेले वरून खुषाल उर्फ बंटी बोरसे व मित्र अरविंद कांबळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक आयपीएस अधिकारी आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.