जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२४
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे एक ते दिड वर्ष वयाच्या बिबट्याच्या छाव्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला असून कोऱ्हाळा शेती शिवारात ही घटना दि १ डिसेंबर रविवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुह्यापासून जवळच असलेल्या कोऱ्हाळा शेती शिवारातील गट नंबर ८२ मध्ये शेतकरी अशोक लक्ष्मण सोनवणे रा. कुऱ्हा (काकोडा) नेहमीप्रमाणे शेतात गेले असता विहिरीजवळ गेले आणि डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत काही तरी वन्यजीव पडलेल्या मृत अवस्थेत दिसला त्यांनी लागलीच वनविभागाला कळविले माहिती समजताच वढोदा वनपरिक्षेत्राच्या प्रभारी वनाधिकारी कृपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्रीमती भावना मराठे, वनरक्षक स्वप्निल गोसावी, वनरक्षक सुधाकर कोळी, वनरक्षक उमेश तायडे, योगेश पाटील, गौतम मोरे, विशाल खिरळकर, अशोक तायडे आदी वनविभागाची टिम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली आणि युक्ती लढवून पन्नास साठ विहिरीत खोल पाण्यात तरंगत असलेल्या मृत बिबट्याच्या शावकाला बाहेर काढले आणि वनविभागाच्या कुऱ्हा येथील कार्यालयात आणले.
वनविभागाने तात्काळ पशुधन विकास अधिकारी डॉ. मनोज पाटील यांना घटनेची माहिती दिली असता लागलीच वनविभागत डॉ. मनोज पाटील, डॉ. स्वागती कारामुंगे, सुनील यादव, भगवान पारधी, सचिन चव्हाण यांच्या पथकाने मृत बिबट्याच्या शावकाचे शवविच्छेदन केले यावेळेस वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वन्यजीव रक्षक विवेक देसाई, वनाधिकारी कृपाली शिंदे, वनपाल भावना मराठे व सहकारी यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या कुऱ्हा येथील कार्यालयाच्या मागे अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याचा शावक (पिल्लू) हे दिड वर्षाच्या जवळपास होते आणि नर होत त्यामुळे त्याची आई (बिबट्या मादी) च्या मागेच तो असेल मात्र रात्रीच्या वेळेस आईपासून भरकटल्या मुळे पाय घसरून तो विहिरीत पडलेला असावा. जिवनदायनी पुर्णा नदीचा काठ असल्याने कोऱ्हाळा, पिंप्राळा शेती शिवारात वन्यजीव संचार करीत असल्याचे आढळून येत आहे.