जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२४
राज्यातील जनतेने महायुतीला एकहाती सत्ता दिल्यानंतर आज महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार असून या मंत्रीमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मतदार संघाचे आ.संजय सावकारे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात येणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.
भुसावळ मतदार संघातून आमदार संजय सावकारे हे चौथ्यांदा निवडून आलेले असून सन २००९ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर संजय सावकारे पहिल्यांदा निवडून आले होते. पहिल्यादाच संजय सावकारे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली होती तर २०१४ विधानसभा निवडणूकी पुर्वी त्यांनी भाजपात प्रवेश करीत त्यांनी भाजपच्या चिन्हावर आमदारकि मिळविली. सलग चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले आहे. त्यांना आता महायुती सरकारच्या मंत्री मंडळात स्थान मिळत असल्याचे समजते.