जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२४
शहरातील निमखेडी शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील साई पॅलेस समोर अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी मंगळवारी तालुका पोलिसात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडी शिवारात असलेल्या साईपॅलेस हॉटेल समोर अवैधपणे वाढू वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवार दि. २३ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच ४० एल ७१५२) हे जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक आकाश संतोष कोळी (वय २७, रा. दिनकर नगर, आसोदा रोड जळगाव) यांच्या विरोधात मंगळवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.