यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील नावरे येथील ४० वर्षीय महिला विरावली शिवारात शेतीकाम करीत असतांना अंगावर विज कोसळून जागीच मरण पावल्याची घटना घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की, आज गुरुवार, दि.२३ जून रोजी नावरे येथील रिना सुनिल मेढे या ४० वर्षीय महिला विरावली शिवारात शेतीकाम करीत होत्या. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पाऊस सुरु असताना अचानक यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असतांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बि.बि.बारेला यांनी त्यास मृत घोषित केले.
या संदर्भात उतम भोजू मेढे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिला यांना एक १८ आणि एक १६ वर्षाचा मुलगा असून ६ महिन्यांपूर्वी सुनील भोजू मेढे हे यांचादेखील अपघाती मृत्यू झाला होता. आई आणि वडील दोघही हे जग सोडून गेल्यामुळे मुलांवर दुःखाचे आभाळ कोसळले आहे.