जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२४
अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथे गावठी दारू विकणाऱ्या एकाला व विनापरवाना देशी विदेशी दारू विकणाऱ्या दोघांना मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.२९ रोजी मारवड पोलीस ठाण्याचे पीएसआय राहुल बोरकर, हेकॉ सचिन निकम व पोकॉ हेमचंद्र साबे यांनी अमळगाव येथे छापा टाकला असता हॉटेल समृद्धी जवळ पडक्या घरात रवींद्र रामा कुंभार रा. अमळगाव (वय ४८) हा गावठी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडे ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर गावठी दारू आढळून आली. तेथून जवळच भिकन उत्तम पारधी रा.अमळगाव (वय ३५) व मल्हारी भिला कोळी रा. पिळोदे (वय ५२) हे विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडे अनुक्रमे ३४८० रूपये व ५५३० रूपये किमतीची वेगवेगळ्या कंपनीची दारू आढळून आली. नमुने घेऊन तिघांना ताब्यात घेत मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.