जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
कामासाठी आलेला विकासचंद्र मुकुंदा प्रधानन (वय २४ रा. कृष्णा कंपनी, एमआयडीसी) हा तरुण कंपनीच्या खोलीत वास्तव्यास होता. या तरुणाने दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर गेल्याचा चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी दुपारच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील कृष्ण कंपनीत विकासचंद्र प्रधानन हा तरूण गेल्या काही महिन्यांपासून कामाला होता. तो कंपनीतील एका खोलीत त्याचे वास्तव्य होते. दि. २८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्याने कंपनीत असतांना विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याचा प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असतांना बुधवार दि. १ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता प्राणज्योत मालविली. विषारी औषध घेण्याचे कारण समोर आलेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
