जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५
ज्यांनी अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली अशा राजमाता जिजाऊ साहेब व ज्यांनी संपूर्ण विश्वावर हिंदुत्वाचा प्रभाव निर्माण केला असे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती आज १२ जानेवारी रविवार रोजी सकाळी ९ वाजता महाबळ येथील अंबरवेल क्रीडांगण येथे जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव अनिल खैरनार अ भा शिंपी समाज माजी युवक अध्यक्ष मनोज भांडारकर अ भा युवक कार्याध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यारपण करण्यात आले कार्यक्रमा प्रसंगी स्वामी विवेकानंदांच्या वैशभुशेमध्ये चि ओम भांडारकर यांनी स्वामीजींचे भगवे कपडे परिधान केले होते जळगाव शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी सचिव हेमंत शिंपी एसपीएल प्रमुख सुमित अहिरराव प्रसिद्धी प्रमुख चार्ली सागर शिंपी नाना भंडारकर यशवंत शिंपी सागर कापुरे गणेश सोनवणे मुडकर साहेब,नितेश सोनवणे विकी जगताप केतन अहिरराव, निलेश शिंदे ,व असंख्य युवक कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते .