पाचोरा : प्रतिनिधी
आजचा युवावर्ग हा उद्याचा भावी समाज आहे. परंतु आजच्या युवा वर्गाला कुसंग, व्यसन, सिनेमा याची किड लागल्यामुळे युवा वर्ग हा बिघडत चालला आहे. असे प्रतिपादन माउंट आबू राजस्थान वरुन आलेले प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे राजयोगी ब्रह्मकुमार भगवानभाई यांनी प्रतिपादन केले. ते बुरहानी इंग्लिश मीडियम, नवजीवन विद्यालय आणि उच्च माध्यमिक कन्या शाला मध्य ‘छात्र, छात्रांना जीवनामध्ये नैतिक शिक्षणाची गरज’ विषयावर बोलत होते.
भगवानभाईंनी सांगितले की, आजच्या सामाजिक सर्व समस्यांचे मूळ कारण म्हणजे नैतिक मूल्यांची कमतरता; ते सर्व विद्यार्थ्यांना म्हणाले की, तुम्ही समाजामध्ये जाण्याच्या पूर्वी भौतिक शिक्षणाबरोबर नैतिक शिक्षण घेणे सुध्दा गरजेचे आहे. ते या कार्यक्रमामध्ये बी. के. विष्णु, बी. के. रामदास, बी. के. गणेश सुध्दा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी राजयोगचा अभ्यास करविला.