
जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२५
जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील कांग नदीच्या पुलावर १३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास डंपर व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून डंपरचा चालक फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनीचे डंपर (एमएच १२. व्हीबी ८६७७) हे जामनेर कडून भुसावळकडे तर हिरो स्पेलंडर कंपनीची दुचाकी (एमएच-४८ बीएस- २३७५) ही भुसावळ कडून जामनेरकडे येत होती. हे दोन्ही वाहने कांग नदीच्या पुलावर आल्यावर त्यांच्यात अपघात झाला. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूची वाहतूक काहीकाळ ठप्प होवून वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.