मेष : सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला लक्षणीय यश मिळवून देईल. नातेवाईकांशी संबंध अधिक मजबूत होतील. मालमत्ता किंवा वारसा संबंधी काही कामांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता. भावांसोबतचे संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. तुमची कार्यशैली आणि योजना तुमच्या व्यवसायाला चालना देऊ शकते.
वृषभ : राजकीय आणि सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल. नवीन वाहन खरेदीबाबत योजना असेल. काही उधार दिलले पैसे परत मिळाल्याने आर्थिक समस्या सोडवता येते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
मिथुन : आज तुम्ही नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल. तुमचा मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होईल. एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी, त्यांच्या सर्व स्तरांचा काळजीपूर्वक विचार करा. अन्यथा कोणीतरी तुमच्या भावनिकतेचा आणि उदारतेचा फायदा घेऊ शकते. भागीदारीशी संबंधित व्यवसायात पारदर्शकता बाळगा. पती-पत्नीमध्ये योग्य सुसंवाद राखला जाईल. आरोग्य चांगले राहिल.
कर्क : आज काही महत्त्वाच्या आणि उच्च पदावरील व्यक्तींसोबत वेळ व्यतित कराल. तुमचा आदरही वाढेल. नवीन यश मिळविण्याचा मार्गही सुकर होईल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी, त्याच्याशी संबंधित योजनांचा पुनर्विचार करा. एक छोटीशी चूक तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. व्यवसायात केलेल्या बदलाची लवकरात लवकर अंमलबजावणी करा.
सिंह : आज घराच्या नूतनीकरणाशी संबंधित योजना असेल. चांगली आर्थिक स्थिती राखण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. मालमत्ता प्रकरणी भावासोबतचा वाद टाळा. तुम्ही व्यवसायात अधिक व्यस्त राहू शकता.
कन्या : मालमत्तेशी संबंधित न्यायालयीन खटला मार्गी लागण्याची शक्यता. नातेवाईकांसोबतचा कोणताही वाद काळजीपूर्वक हाताळा. तुमच्या योजना कोणालाही सांगू नका; कोणीतरी त्याचा फायदा घेऊ शकते. व्यवसाय क्षेत्रातील कोणत्याही कृतीकडे दुर्लक्ष करू नका. घराचे वातावरण आनंददायी राहिल. आहाराकडे दुर्लक्ष केल्याने पोट खराब राहू शकते.
तूळ : आज कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुमच्या विवेकाचे ऐका; तुम्हाला निश्चितच चांगली समज आणि विचार करण्याची क्षमता मिळेल. घरात कोणतेही कठीण काम पूर्ण करण्यासाठी योजना आखली जाईल. निष्काळजीपणामुळे जवळच्या नातेवाईकाशी संबंध बिघडू शकतात. घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. यंत्र आणि लोखंडाशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. पती-पत्नी नात्यात योग्य सुसंवाद राखला जाईल.
वृश्चिक : तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करुन वाटचाल करा. सध्या वाहन खरेदीचा विचार टाळा. आर्थिक बाबी सामान्य राहतील. अनावश्यक खर्च कमी करा. व्यावसायिक कामांमध्ये कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता असेल. पती-पत्नीचे एकमेकांना सहकार्य लाभेल. अॅलर्जीचा त्रास असणार्यांनी काळजी घ्यावी.
धनु : आध्यात्मिक कार्यक्रमातील सहभागामुळे मानसिक शांतता लाभेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी योग्य वेळ आहे. महत्त्वाची कागदपत्रे संभाळा. छोट्याशा चुकीमुळे मोठे परिणाम होऊ शकतात. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. तुम्ही एखाद्यासोबत भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर तुमची भागीदारी खूप चांगली राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.
मकर : आज तुम्हाला एखाद्या गरजू मित्राला केलेल्या मदतीमुळे तुम्हाला दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ज्येष्ठांचा सल्ला घ्या. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. व्यवसाय क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये काही व्यत्यय येऊ शकतो. जोडीदार आणि कुटुंबाचा पाठिंबा कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढवेल.
कुंभ : ग्रह स्थिती तुमच्यामध्ये पूर्ण मनोबल आणि आत्मविश्वास राखेल. तुमचा आदर आणि प्रतिष्ठा सामाजिकदृष्ट्या देखील वाढेल. आर्थिक समस्या जाणवेल; पण ही स्थिती काही काळ राहील. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे.