पाचोरा :प्रतिनिधी
इपीएस – ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचा उत्तर महाराष्ट्र संघटनेचा भव्य मेळावा दि. २६ जुन रोजी संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पाचोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय गोहील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून इपीएस – ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत (कमांडर), महिला राष्ट्रीय अध्यक्षा शोभा आरस, पश्चिम भारत मुख्य समन्वयक सरिता नारखेडे, मुख्य समन्वयक विलास पाटील (बुलढाणा), एस. एन. अंबेकर उपस्थित होते.
खडकदेवळा रोडवरील नाथमंदिरात इपीएस – ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती पाचोरा – भडगाव तालुक्याच्या वतीने इपीएस – ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र संघटनेचा भव्य मेळावा दुपारी २ वाजता संपन्न झाला. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ईपीएस – ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे मुख्यालय बुलढाणा येथे दि. २४ डिसेंबर २०१८ पासुन साखळी उपोषण सुरू आहे. तर दि. १ जुन २०२१ रोजी देशभरातील ६५ लाख ईपीएस – ९५ पेंशनर्सनी कुटुंबासह आप-आपले घरी बसुन १ दिवसीय उपवास आंदोलन करुन आंदोलनाचे फोटो व संदेश प्रशासनास ईमेलद्वारे पाठवुन पेंशनवाढ करण्याची विनंती केली.
ईपीएस – ९५ पेंशनर्स ला दरमहा ७ हजार ५०० रुपये पेन्शन व महागाई भत्ता देण्यात यावा, पेंशनधारक व त्यांच्या पत्नीला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. या प्रमुख व रास्त मागण्यांसाठी ईपीएस – ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती ही गेल्या अनेक वर्षांपासून देशात ठिकठिकाणी आंदोलने, मेळावे घेऊन संघर्ष करीत आहे. त्याच अनुषंगाने पाचोरा येथे या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास राष्ट्रीय संघर्ष समितीचे जळगांव जिल्हा समन्वयक अनिल पवार, धुळे जिल्हा अध्यक्ष देविसिंग जाधव, नारायण होन (कोपरगाव), जळगांव जिल्हा अध्यक्ष अरविंद भारंबे, उपाध्यक्ष रमेश नेमाडे, पाचोरा तालुका अध्यक्ष नंदलाल बोदडे, सचिव दिलीप झोपे, कार्यकारिणी सदस्य कौतिक किरंगे, हरिष प्रेमा आदिवाल, अशोक पाटील, राजेंद्र चव्हाण, पारोळा तालुका अध्यक्ष दिलीप सोळंके सह राष्ट्रीय संघर्ष समितीचे जळगांव, धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक अनिल पवार तर सुत्रसंचलन जामनेर तालुका सचिव एच. एन. व्यवहारे यांनी केले.